...मग संजय दत्तचे वर्तन चांगले कसे? - हायकोर्ट

  Fort
  ...मग संजय दत्तचे वर्तन चांगले कसे? - हायकोर्ट
  मुंबई  -  

  1993 मुंबई ब्लास्टमध्ये दोषी असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या पेरोलवरून उठलेला वाद त्याच्या सुटकेनंतर दीड वर्षांनी देखील शमण्याचे नाव घेत नाही. चांगल्या वर्तणुकीवरून महाराष्ट्र सरकारने संजय दत्तची शिक्षा कमी केली खरी. पण या संजू बाबाच्या चांगल्या वर्तणुकीवरच मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'दोन वेळा पेरोल जम्प करूनही संजय दत्तची वागणूक चांगली कशी?' असा प्रश्न कोर्टाने सरकारला विचारल्याची माहिती या याचिकेचे वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे.

  संजय दत्तला कारागृहातून लवकर सोडल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान जस्टीस आर. एम. सावंत आणि साधना जाधव यांनी सरकारवर दोन्ही बाजूंनी प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रकरणी तीन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश यावेळी कोर्टाने सरकारला दिले.

  1993 मुंबई साखळी स्फोटामध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील 18 महिने शिक्षा त्याने याआधीच भोगली होती. उर्वरित 42 महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये गेलेला संजय दत्त सतत बाहेर येतच होता. ऑक्टोबर 2013 मध्ये संजय दत्तला फर्लो मंजूर झाला. त्यानंतर डिसेंबर 2013 मध्ये महिन्याभरासाठी पेरोलवर तो पुन्हा बाहेर आला. जी दोन वेळा वाढवण्यात आली. त्याच्या शिक्षेपैकी तब्बल 118 दिवस संजय दत्त हा जेलच्या बाहेरच होता.

  संजय दत्तने त्याची पेरोल जम्प केली होती असे असूनही सरकारने त्याची वर्तणूक कशी चांगली ठरवली? असा सवाल देखील यावेळी कोर्टाने उपस्थित केला. पेरोल आणि फर्लो या दोन्हींच्या वेगवेगळ्या याद्या तयार होता आणि यादीनुसारच कैद्याची (बंद्याची) पेरोल किंवा फर्लो मंजूर होते. संजय दत्तच्या प्रकरणात मात्र सगळ्या नियमांना धाब्यावर बसवण्यात आले. दोन्ही याद्यांमध्ये त्याचा नंबर हा 200 हून पुढे असून, देखील त्याला दहाव्या क्रमांकावर दाखवण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील नितीन सातपुते यांनी दिली.

  सरकारने दावा केला की जेलमध्ये देखील संजय दत्तची वागणूक चांगली होती. आम्ही आरटीआयच्या माध्यमातून जेलमधील सीसीटीव्ही फुटेज मागितले होती. पण संजय दत्तने हे फुटेज कोणालाही न देण्यास सांगितल्याचे आम्हाला कारागृहाकडून सांगण्यात आले. आता आम्ही या फुटेजसाठी थेट कोर्टात जाणार आहोत. त्यानंतर दूध का दूध और पानी का पानी हो जायेगा असे देखील सातपुते यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.