शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीचे समन्स

राऊत यांनी आपण पूर्ण सहकार्य दिल्याचे नमूद केले आणि ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीचे समन्स
SHARES

गोरेगाव पत्रा चाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा समन्स बजावले आहे. त्यांना २७ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले आहे.

राऊत यांना ईडीने समन्स पाठवून बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण कामानिमित्त दिल्लीत असल्यामुळे राऊत ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. अखेर त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता.

पण ईडीने त्यांची मागणी फेटाळली असून बुधवारी ईडीन त्यांना नवीन समन्स दिले आहे. त्यात त्यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधीत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला; परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही.

६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून विकासकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात २०११ मध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली.

म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा