कंगनाच्या चाहत्याकडून संजय राऊत यांना धमकी, कोलकत्यातून एकाला अटक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर राऊतांनी तिला चांगलेच फटकारले. दोघांमध्ये चांगलाच शाब्दीक वाद झाला.

कंगनाच्या चाहत्याकडून संजय राऊत यांना धमकी, कोलकत्यातून एकाला अटक
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबईची तुलना POK सोबत केल्यावर सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत आहे. त्यात संजय राऊत आणि तिच्यामध्ये झालेल्या शाब्दीक वाद सर्वांना ज्ञात आहे. याच दरम्यान कंगना विरोधात बोलणाऱ्या अनेकांना धमक्यांच्या फोननं एकच खळबळ उडवून दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांना तर एका माथेफिरूने सोशल मिडियावर खुल्ली जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एका व्यक्तीला कोलकत्ता येथून अटक केली आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेपासून ते सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वेळोवेळी शिवसेना नेते संजय राऊत भाजपला अंगावर घेत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर राऊतांनी तिला चांगलेच फटकारले. दोघांमध्ये चांगलाच शाब्दीक वाद झाला. कंगनाने तर हद्द मोडून मुंबई मला POK व्याप्त काश्मिरसाठी वाटत असल्याचे विधान केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर टिका केली. या वादा दरम्यान कंगनाच्या एका चाहत्याने सोशल मिडियावर शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी दिली. या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र दहशता विरोधी पथकाने संबधित अकाऊन्टचा माग काढला. त्यावेळी हे अकाऊन्ट कोलकत्ता येथील एक व्यक्ती हाताळत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या एका पथकाने त्याला अटक केली आहे.  त्याला कोलकत्तामधील न्यायालयात हजर करून  ट्रान्झिस रिमांडद्वारे मुंबईत आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा:-हृदयद्रावक घटना : आई पाठोपाठ पोलिसाचाही कोरोनाने मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा