SHARE

सांताक्रुझ - एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी सांताक्रुझच्या कालिनामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहाते. गुरुवारी ती एकटीच असल्याचा फायदा घेत एका अनोळखी व्यक्तीने घरात प्रवेश केला. तेव्हा त्या व्यक्तीने आपण पोलीस असून चौकशीसाठी आले असल्याचे सांगत मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केले. घडलेला प्रकार मुलीने घरच्यांना सांगितला. त्यानंतर यासंदर्भात कुटुंबियांनी बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताच सुगावा लागला नाही. 'हा विषय संवेदनशील असल्यामुळे कोणतीच माहिती पुरवू शकणार नसल्याचे' डिसीपी अशोक दुधे यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या