घोटाळेबाज नीरव मोदीच्या अडचणीत वाढ, सातव्यांदा फेटाळली याचिका

सातव्यांदा ब्रिटन न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदी अजूनही तुरूंगात राहणार आहे.

घोटाळेबाज नीरव मोदीच्या अडचणीत वाढ, सातव्यांदा फेटाळली याचिका
SHARES

भारतातील बँकांना चुना लावून फरार झालेला घोटाळेबाज नीरव मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सातव्यांदा ब्रिटन  न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळून लावली आहे.  त्यामुळे नीरव मोदी अजूनही तुरूंगात राहणार आहे. नीरव मोदीची या पूर्वीच भारतातील सर्व संपत्तीही ईडीने जप्त करून त्यातील आलिशान घर, महागड्या कारची सफेमा कायद्यांतर्गत लिलाव करण्यात आला आहे. 

नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाची फसवणूक आणि पैशांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. नीरव मोदीला भारतकडून फरार घोषित केले गेले आहे. मागील सुनावणीत नीरव मोदी यांच्या वकिलांनी नीरवची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कोर्टाला सांगितले होते. तो नैराश्यात आहे. भारतात पाठविल्यावर तो तेथे आत्महत्या करू शकतो. नीरवच्या वकिलांच्या या याचिकेवर ब्रिटीश कोर्टाने नीरवच्या कौटुंबिक इतिहासाविषयी माहिती मागितली होती. कोर्टाने त्यावेळी विचारले होते की, नीरवच्या कुटुंबातील किती सदस्यांनी आत्महत्या केली. अलीकडेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुल नाथ शेट्टी आणि त्यांच्या पत्नीविरोधात अतिरिक्त मालमत्ता प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. शेट्टी यांच्यावर नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांना मदत केल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे.

हेही वाचाः- महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?

दरम्यान, ईडीने आतापर्यंत नीरव मोदीची ३२९.६६ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात त्याच्या मुंबई, दुबई आणि लंडनमधील फ्लॅटचा समावेश आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने ८ जून रोजी झालेल्या सुनावणीत ईडीला नीरव मोदीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते
संबंधित विषय