डोक्यात तवा पडून चिमुरडी गंभीर जखमी

 Madanpura
डोक्यात तवा पडून चिमुरडी गंभीर जखमी
Madanpura, Mumbai  -  

मदनपुरा - डोक्यात लोखंडी तवा पडल्याने 10 वर्षाची अजिगा फैजान कपाडिया गंभीर जखमी झाल्याची घटना मदनपुरा परिसरात शुक्रवारी घडली. तिला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सेंट जॉर्ज शाळेत तिसरीत शिकणारी अजिगा शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. मात्र तिथून साडेनऊच्या सुमारास घरी येऊन ती पुन्हा क्लासला गेली. तिथून ती सव्वा अकराच्या सुमारास घरी परतत असताना ही चिमुरडी मदनपुरा इथल्या जिल्हा टॉवर आणि स्टार इमारतीमधील मोरलेन रोडवर आली आणि अचानक तिच्या डोक्यात अडीच किलोचा तवा पडला. उंचावरून पडलेल्या या तव्याचा आघात एवढा जबरदस्त होता की अजिगा तिथेच कोसळली. सध्या अजिगाला नायर रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी भादंवि 338 या कलमांतर्गत अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading Comments