विनयभंगप्रकरणी एक अटकेत, दोघे फरार

 Goregaon
विनयभंगप्रकरणी एक अटकेत, दोघे फरार

गोरेगाव - अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोघे अद्याप फरार आहेत. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुले असून एक 19 वर्षांचा मुलगा आहे. अल्पवयीन मुलगी ही गोरेगावच्या प्रेमनगरमधील राहणारी आहे. मागील तीन महिन्यांपासून हे तिघेही मुलीची छेड काढत होते.

सोमवारी मुलगी शाळेतून घरी येत असताना तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर मुलीने घडलेली बाब तिच्या पालकांना सांगितल्यानंतर मुलीच्या वडिलांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तिन्ही रोडरोमियोंविरोधात तक्रार दाखल केली. यामध्ये 19 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली असून दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading Comments