भारतात 11/9 सारख्या घातपाताचा प्लॅन?

 vile parle
भारतात 11/9 सारख्या घातपाताचा प्लॅन?

मुंबई, चेन्नई सह हैद्राबादवरून उडणाऱ्या विमानांचं एकाच वेळी अपहरण करण्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. अपहरणाच्या या वृत्तानंतर तीनही विमानतळांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं सीआयएसएफकडून सांगण्यात आलं आहे. विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पोलिसांची देखील मदत घेण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी या तीनही विमानतळावरून उडणाऱ्या विमानांच्या मार्गांवर 23 लोकांची टोळी असल्याचं वृत्त आहे.

एका महिलेने मुंबई पोलिसांना एक इमेल केला असून, त्यात तिने 3 ते 6 मुलांना अशा प्रकारे एकाच वेळी मुंबई चेन्नई सह हैद्राबादवरून उडणाऱ्या विमानाचं अपहरण करण्याचा कट रचत असल्याचं एेकल्याचं म्हटलं आहे. हा प्लॅन किंवा हा इमेल खोटा देखील असू शकतो. मात्र तरीही सुरक्षा यंत्रणांनी या तिन्ही विमानतळाची सुरक्षा वाढवली आहे.

Loading Comments