कांदिवलीत शेअर व्यापाऱ्याची हत्या

कांदिवली - धारदार हत्यारानं एका 65 वर्षीय शेअर व्यापाऱ्याची हत्या करण्यात आलीय. देवेंद्र दोशी असं या मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अज्ञात व्यक्तीनं त्यांची हत्या केलीय. देवंद्र दोशी हे शेअर मार्केटचे व्यापारी होते. ते एकटेच राहत होते. त्यांची पत्नी विवाहित मुलासोबत दुसरीकडे राहत होती. देवेंद्र दोशी यांचं व्यवसायावरून काही लोकांसोबत वाद असल्याचं समोर आलंय. त्यामुळे हत्येचं हेच प्रमुख कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत.

Loading Comments