पेणमध्ये बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार


पेणमध्ये बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार
SHARES

रविवारी सकाळी पेण येथील बसस्थानकात झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मुत्यू झाला आहे. एसटी बसची जोगदार धडक बसल्याने सुरेश गंगाधर रिसबुड (७५) यांचा जागीच मृत्यू झाला.

सुरेश रिसबुड हे ५ ऑगस्टला सकाळी ९.५३ वाजता पेण येथील बसस्थानकाजवळून आपल्या सायकलवरून जात होते. त्यावेळी मुंबई-श्रीवर्धन ही बस पेण आगाराच्या प्रवेशदारातून आत जात होती. त्यावेळी बसची धडक बसल्याने सुरेश रिसबुड खाली कोसळले. बसच्या मागच्या चाकात आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला.


सुरेश मुंबईतले रहिवासी

सुरेश रिसबुड हे मूळचे विरार येथील रहिवासी असून सध्या ते पुण्यातील लोकमान्य हाऊसिंग सोसायटी येथे राहत होते. पेण येथील बस आगाराचे प्रवेशद्वार अतिशय अरुंद आहे. तसंच त्याठिकाणी अनधिकृतपणे वाहन पार्किंग केले जातात यामुळे येता जाता अनेक अपघात होत असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा