सलमान खानच्या SKF कंपनीच्या नावाने फसवणूक, अभिनेता अंश अरोराची पोलिसात तक्रार

सलमानच्या SKF कंपनीकडून 'टायगर झिंदा है 3' मध्ये प्रमुख खलनायकाच्या भूमिकेची दिली होती ऑफर

सलमान खानच्या SKF कंपनीच्या नावाने फसवणूक, अभिनेता अंश अरोराची पोलिसात तक्रार
SHARES

चिञपटसृष्टीत दबंग अभिनेता सलमान खानसोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेञी आणि अभिनेते उत्सुक असतात. तसेतर अनेकांनी बोलून ही दाखवले आहे. नव्या कलाकारांना सलमान खान त्याच्या चिञपटात कायमच संधी देत आल्याचे त्याच्या अनेक चिञपटातून पहायला मिळाले आहे. 
नेमके याच गोष्टीचे भांडवल करून काही जणांनी सिरियल अभिनेता अंश अरोरा याची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी त्याने पोलिसात ही तक्रार नोंदवली आहे. ही बाब सलमानला समजताच त्याने सोशल मिडियावर या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

टिव्ही सिरियलवरील 'कसम तेरे प्यार की' क्वींस है हम, तनहाई या सारख्या मालिकांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अंश अरोराला काही दिवसांपूर्वी सलमानच्या कंपनीच्या नावे मेल आला होता. तसेच त्याला श्रूती नावाच्या तरुणीने फोन करून सलमानच्या SKF कंपनीकडून 'टायगर झिंदा है 3' मध्ये प्रमुख खलनायकाच्या भूमिका देण्याची ऑफर देण्यात आली होती. या चिञपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करत असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याच बरोबर  3 मार्चला या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभू देवा स्वतः अंशचे ऑडिशन घेणार होते, अशा ईमेलही अंशला आला होता. पण काही कारणामुळे ते व्यस्त असल्यामुळे ही ऑडीशन रद्द करण्यात आली. पण त्याचे व्हिडिओ व छायाचित्र पाहून  अंशला खलनायकाच्या भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले असून याबाबतची बैठक काही दिवसानंतर आयोजित करण्यात आली असल्याचेही अंशला सांगण्यात आले. 


माञ अशा प्रकारे अन्य काही जणांना सलमानच्या नावाने आँफर करण्यात  आल्याचे सलमानला कळाल्यानंतर त्याने सोशल मिडियावर ट्विट करून "आपली प्रोडक्शन कंपनी कोणत्याही प्रकारचे कास्टींग सध्या करत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. नवीन कास्टींग करण्यासाठी आम्ही कोणत्याही कास्टींग एजंटला सांगितले नसून अशा संबंधीत ई-मेल अथवा दूरध्वनी आपल्याला आले असतील, तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. जो असा प्रकारची अफवा पसरवत आहे, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सलमानने स्पष्ट केले.


आपली ही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अंशने संबधित व्यक्तीला त्याचे फोटो आणि व्हिडिओ आँडिशनसाठी पाठवले होते. त्याचा कुणी ही गैरवापर करून  बदनाम केले जाण्याची शक्यता वर्तवत अंशने संबधित आरोपी महिले विरोधात ओशिवरा पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा