चिमुरड्यांवर अत्याचार करणारा गजाआड

 Sahar airport
चिमुरड्यांवर अत्याचार करणारा गजाआड

मुंबईच्या सहार पोलिसांनी एका सराईत नराधमाला अटक केली आहे. दिनेश पांचाळ (32) असं या नराधमाचं नाव असून, त्याच्यावर या आधीही अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 

सहार परिसरात दोन चिमुरड्या रविवारी संध्याकाळी खेळत होत्या. त्यावेळी या नराधमाची नजर त्यांच्यावर पडली, चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून त्याने या दोघींना बोलावून घेतलं. जवळपास कुणी नसल्याचा फायदा घेऊन त्यांच्यावर या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार जेव्हा स्थानिकांना समजला तेव्हा त्यांनी या नराधमाला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला पोक्सो कायद्यांतर्गत अटक केली असून, सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. याआधीही या नराधमाने नशेत असताना कित्येकदा असा प्रकार केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

Loading Comments