८९ लाखांच्या चोरी प्रकरणी ७ जणांना अटक

मुंबईत सध्या लाँकडाऊन असल्यामुळे ही कंपनी मार्चपासूनच बंद होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपींनी या कंपनीतील ८९. ८८ लाखांच्या वस्तू चोरून आरोपींनी पळ काढला.

८९ लाखांच्या चोरी प्रकरणी ७ जणांना अटक
SHARES

शिवडीच्या हाजीबंदर येथून ८९ लाखांचा मुद्देमाल  चोरणाऱ्या ७ आरोपींच्या मुस्क्या आवळण्यात शिवडी पोलिसांना यश आलेलं आहे. साजीद मोहम्मद आरीफ शेख उर्फ मुल्ला (१९), करम हुसेन अब्दुला शेख (५२), ममत्या उर्फ सत्यवेल तुरवेल हरिजन (४८), मोहम्मद युसुफ  मुल्ला (२७), इरशाद खानसाहब पठान (६२), गणेश टालमले कावडरे (३५), शाहरूख वसीम खान (२६) अशी या आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचाः-  उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!

शिवडीच्या हाजीबंदर येथील नीमा वेअर हाऊस या  कंपनीकडून महागड्या बॅग, ज्वेलरी, मोबाइल या सारख्या महागड्या वस्तूंची निर्यात केली जाते. मुंबईत सध्या लाँकडाऊन असल्यामुळे ही कंपनी मार्चपासूनच बंद होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपींनी या कंपनीतील ८९. ८८ लाखांच्या वस्तू चोरून आरोपींनी पळ काढला. या चोरीची माहिती कंपनीच्या मालकाला मिळाल्यानंतर कंपनीकडून शिवडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिस उपनिरीक्षक किरण मांडरे यांनी तपासाला सुरूवात केली. आरोपी इतके हुशार होते की, त्यांनी कंपनीत चोरी करण्यापूर्वी कंपनीतील सर्व प्रवेशद्वार आणि सीसीटिव्ही कुठे कुठे आहेत याची रेखी केली होती. त्यामुळे कंपनीतील सीसीटिव्हीत आरोपींची ओळख पाठवणे कठीण जात होते.  

 हेही वाचाः-  उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!

पोलिसांना त्यांच्या सूत्रांनी या चोरीबाबत काही महत्वाची माहीती दिली. हे सर्व आरोपी भायखळा, रे रोड परिसरातले असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने साजीद मोहम्मद आरीफ शेख उर्फ मुल्ला (१९), करम हुसेन अब्दुला शेख (५२), ममत्या उर्फ सत्यवेल तुरवेल हरिजन (४८), मोहम्मद युसुफ  मुल्ला (२७), इरशाद खानसाहब पठान (६२), गणेश टालमले कावडरे (३५), शाहरूख वसीम खान (२६) यांना  एका पाठोपाठ एक अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी २५ लाखांचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. या प्रकरणी शिवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.   

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा