ग्रँट रोडमध्ये दोन महिला इमारतीवरून पडल्या, एकीचा जागीच मृत्यू


ग्रँट रोडमध्ये दोन महिला इमारतीवरून पडल्या, एकीचा जागीच मृत्यू
SHARES

मंगळवारी रात्री ग्रँट रोडच्या एका इमारतीवरून दोन महिला अचानक खाली पडल्या. यामध्ये एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे. या घटनेमुळे ग्रँट रोड परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरात वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे तपासणीसाठी पोलिसांची पथकं फिरस्तीवर असतात. अशाच एका तपासणीदरम्यान हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.


दोरी टाकून पळण्याचा प्रयत्न भोवला

डी. बी. मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचं एक पथक ओम निवास या बिल्डिंगमध्ये तपासणी करण्यासाठी गेलं असता या दोन महिला अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी या दोघींनी तिसऱ्या मजल्यावरच्या एका खिडकीतून दोरी खाली टाकून पळण्याचा प्रयत्न केला.


तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली...

मात्र, या महिलांचा पळून जाण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. दोरीवरून खाली उतरत असताना तोल जाऊन या दोघी थेट खाली पडल्या. त्यांना तातडीनं जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यातल्या एका महिलेला मृत घोषिक केलं, तर दुसरी महिला गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या दोन्ही महिला वेश्या व्यवसाय करायच्या. त्या पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथून आल्या असल्याचं सांगितलं जात आहे.



हेही वाचा

साठ्ये कॉलेजच्या प्राध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा