COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

साठ्ये कॉलेजच्या प्राध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू


साठ्ये कॉलेजच्या प्राध्यापिकेचा संशयास्पद मृत्यू
SHARES

विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा भावे (५३) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. मनीषा अंधेरी पूर्वेकडील गौरेश अपार्टमेंटमध्ये राहात होत्या. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास भावे यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतलं. त्यादरम्यान त्यांचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला.


हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अंधेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास विषयाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांचा घटस्फोट झाल्याने त्या घरी एकट्याच राहत होत्या. या घटनेदरम्यान त्यांच्या घराचा दरवाजा अातल्या बाजूने बंदावस्थेत होता. तसेच घरातील सर्व वस्तू जागच्या जागीच होत्या. तसेच त्यांच्या मृतदेहाची अवस्था पाहता दोन ते तीन दिवस आधी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान मनीषा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा