नालासोपाऱ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Nalasopara East
नालासोपाऱ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
नालासोपाऱ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
नालासोपाऱ्यात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
See all
मुंबई  -  

नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात समोर आली आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी पटकथा लेखक भूपेश मिश्रा(30) याला अटक केली असून,पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायगाव पूर्व परिसरात राहणारा भूपेश मिश्रा हा पटकशा लेखक आहे. त्याचे नालासोपारा पश्चिम येथील पंचालनगर येथे ऑफिस आहे. जुलै 2016 मध्ये नालासोपाऱ्यातील मोरेगाव परिसरात राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीला त्याने आपल्या ऑफिसमध्ये टायपिस्टची नोकरी दिली. या दरम्यान या नराधमाने तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं. तिला नोकरीचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा युवती गर्भवती राहिली तेव्हा त्याने तिला गर्भपात करायला सांगत तिला नोकरीवरून काढून टाकले आणि स्वत: फरार झाला. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी कलम 376(2) एन, 313, 417, 323, 506, 507 अंतर्गत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, कोर्टाने त्याला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.