SHARE

बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना मुंबई पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केलं आहे. शिक्षा भोगून आल्यानंतर आरोपी आकाश जाधव उर्फ गोट्या याच्या विरोधात अपहरण, खंडणी, जीवे मारण्याच्या पाच गुन्ह्यांची नोंद विविध पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे पोलिसांनी त्याला तडीपार केल्याचं झोन 3चे पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांनी सांगितलं.


म्हणून आकाशला केलं तडीपार

महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये जुलै 2013 मध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यामध्ये आरोपी आकाशचाही समावेश होता. मात्र आकाश त्यावेळी 17 वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापूर्वी त्याच्यावर दोन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी महालक्ष्मी परिसरात रहात नसतानाही आकाश त्या परिसरात वारंवार येत होता. त्याच्या विरोधात तीन ते चार गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं होतं. मात्र त्यानंतरही त्याचा विविध गंभीर गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अखेर आकाशला तडीपार करण्याचं ठरवलं. त्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याच्यावर ही तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या