मीटरचा स्फोट होऊन घराला लागली आग

 wadala
मीटरचा स्फोट होऊन घराला लागली आग
मीटरचा स्फोट होऊन घराला लागली आग
See all

वडाळा - वडाळा येथील राजीव गांधीनगर, एस.पी.रोड येथील झोपडपट्टीतील घराला भीषण आग लागली. घराबाहेर असलेल्या लाईटच्या मीटरचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत महेंद्र सिंग बिस्ट हे गंभीर भाजले असून, त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विशेष म्हणजे या घटनेत तिसरा मजला पूर्णत: जळालाय. अग्निशमन दलाने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळल्याचं प्रिया जाधव यांनी सांगितलं.

Loading Comments