शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये ही लेखी तक्रार देण्यात आली आहे.

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप
FILE PHOTO
SHARES

शिवसेनेचे खासदार (Shiv snea MP) राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेनं लेखी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशन (Sakinaka Police Station Mumbai) मध्ये ही लेखी तक्रार देण्यात आली आहे.

मात्र, अद्याप या संदर्भात पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाहीये. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हेतुपुरस्कर हा आरोप करण्यात आला असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

माझ्या विरोधात लेखी तक्रार एका महिलेने दिली आहे. ही तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं हेतुपुरस्कर तक्रार करण्यात आली आहे असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे. या संदर्भात पोलीस प्रशासन योग्य निर्णय घेईल असा मला विश्वास आहे. मी निर्दोष असून कुठल्याही प्रकारच्या चौकशीला तयार आहे. माझ्याविरोधात केलेल्या बोगस तक्रारीमागे कोण आहे याचाही पर्दाफाश लवकरच करेन असंही खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणात देखील नवीन खुलासे झाले आहेत. पीडितीनं 'आपल्या डांबून ठेवून वाटेल ते आरोप करायला लावलं', असा गौप्यस्फोट केला.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर पीडितेनं गंभीर आरोप केले आहे. महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला आहे.हेही वाचा

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी

ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से : अमृता फडणवीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा