Advertisement

ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से : अमृता फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से : अमृता फडणवीस
SHARES

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी गुरूवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला. एका ट्विटद्वारे त्यांनी उद्धव यांचा उल्लेख 'भोगी' असा करुन त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याच्या मुद्यावरून उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे कौतुक केले आहे. तर आमच्या राज्यात केवळ भोगी आहेत असे म्हटले आहे. असे असताना आता अमृता फडणवीस यांनी ऐ भोगी, कुछ तो सीख हमारे योगी से म्हणत मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे.

राज्यातील राजकीय वातावरण हनुमान चालिसा आणि भोंगे प्रकरणवरून ढवळून निघाले आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर मविआ आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ३ मे पर्यंत भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला असताना, तिकडे युपीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंगे काढावे असे सांगितले आहे. यावरून राज ठाकरेंनी त्यांचे पत्र लिहीत कौतुक केले आहे.

महाराष्ट्रात केवळ लोक सत्ता उपभोगता असे म्हणत, महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. याच पत्राचा आधार घेत माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.हेही वाचा

देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला देणार ‘बुस्टर डोस’

महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ : राज ठाकरे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा