दबंग शिवदीप लांडेंना बिहार सरकारकडून पदोन्नती

अवघ्या वर्षभरात लांडे यांनी अंमली पदार्थ विभागाचा आलेख दुप्पटीने वाढवला. नायझेरियन तस्करांपासून मुंबईतील नामकिंत तस्करांना तुरूंगात टाकले.

दबंग शिवदीप लांडेंना बिहार सरकारकडून पदोन्नती
SHARES

मुंबईतील अंमली पदार्थ तस्कर आणि अनधिकृत डान्सबार चालवणाऱ्याचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे यांना बिहार सरकारने पदोन्नती दिली आहे. लांडे हे सध्या मुंबई पोलिस दलात अंमली पदार्थ विभागाचे पोलिस उपायुक्त आहेत. बिहार सरकारने त्यांना पदोन्नती देत पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून बढती दिली आहे. त्यामुळे मुंबईत आता लांडेंकडे कोणती जबाबदारी सोपवली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मूळचे अकोल्याचे असलेले शिवदीप लांडे यांना २००६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर बिहार कॅडर मिळाले. बिहारमध्ये एसपी असताना लांडे यांनी तेथील गुंडागर्दी आणि कोळसा खाणीतील तस्करांविरोधात रान उठवले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांशी संघर्ष करत, राज्यातील नक्षलवादही आटोक्यात आणला. त्यामुळे तेथील सर्वसामान्यांच्या मनात लांडेंविषयी कायमच आदर राहिला. बिहारमधील जनतेने त्यांना ‘बिहार सिंघम’ अशी नवी ओळख दिली. लांडे हे २७ सप्टेंबर २०१७ मध्ये प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले. राज्यात अंमली पदार्थ तस्करांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढल्याने या तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडेवर मुंबईची जबाबदारी सोपवली. अवघ्या वर्षभरात लांडे यांनी अंमली पदार्थ विभागाचा आलेख दु्पटीने वाढवला.

हेही वाचाः- JNU च्या निषेधार्थ मुंबईतील आंदोलन मागे

 नायझेरियन तस्करांपासून मुंबईतील नामांकीत तस्करांना तुरूंगात टाकले. तर अनधिकृत डान्सबार चालवणाऱ्या बारवर छापेमारी करत, बार मालकांचेही धाबे दणाणून सोडले. त्यामुळेच लांडेंच्या नाईट राऊंडला बारमालक विशेष खबरदारी घेतात. बिहार कॅडर असलेल्या लांडे यांना नुकताच महाराष्ट्र सरकारकडून कार्यकाळ वाढवून दिला आहे. त्यामुळे लांडेंवर आता नवी कोणती जबाबदारी दिली जाते याची उत्सुकता आहे.    संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा