घाटकोपर इमारत दुर्घटना, शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात


घाटकोपर इमारत दुर्घटना, शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
SHARES

घाटकोपरच्या दामोदर पार्क येथील साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेनंतर इमारतीचा मालक आणि शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पार्कसाइट पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी दुपारी त्याला विक्रोळी न्यायालयात हजर केले असता 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळली होती. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. या नुतनीकरणादरम्यान इमारतीचे पिलर काढण्यात आल्यानेच ही इमारत कोसळल्याची माहिती उघड झाल्यानंतर शितप यांना अटक करण्यात आली. 



या इमारतीच्या तळमजल्यात रुग्णालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. या नुतनीकरणाला रहिवाशांनी विरोध केला होता. पण, शितप यांनी रहिवाशांचा विरोध न जुमानता काम सुरुच ठेवले. याशिवाय आतले कॉलमही तोडण्यात आले. त्यामुळेच ही इमारत कोसळली
- लालचंद रामचंदानी, रहिवासी


या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 16 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमी राजावाडी आणि शांतीनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मृतांची नावे

  1. रंजनबेन शहा (62) 
  2. सुलक्षणा खानचंदानी (80) 
  3. व्ही. रेणुका ललित ठक (3 महिन्यांची मुलगी)
  4. मनसुखभाई गज्जर (75)
  5. अमृता ललित ठक (31 )
  6. पंढरीनाथ डोंगरे (75) 
  7. दिव्या पारस अजमेरा (48) 
  8. मिकुल खानचंदानी (22) 
  9. ऋत्वी प्रितेश शहा (14) 
  10. किशोर खानचंदानी (50) 
  11. मनोरमा डोंगरे (70) 
  12. क्रीषू डोंगरे (13 महिने) 
  13. प्रमिला विठ्ठल ठक (56)
  14. निराली पारस अजमेरा (24) 
  15. हिना विजय दियोरा (48) 
  16. सुभेद्रबेन धिरजलाल दियोरा (70)
  17. विजय धिरजलाल दियोरा


जखमींची नावे

  1. वर्षा सकपाळ
  2. गीता रामचंदानी
  3. विठ्ठल श्रीगिरी
  4. अब्दुल मोहमद इस्माईल शेख
  5. सुभाष चव्हाण
  6. रिती खानचंदानी
  7. प्रणयाबेन
  8. गणेश टाकडे
  9. प्रितेश शाह
  10. पारस अजमेरा
  11. ऑल्डिकोस्टो डिमेलो
  12. धर्मिष्टा शाह



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा