धक्कादायक ! नागपाडा येथे अंध मुलीवर अत्याचार


धक्कादायक ! नागपाडा येथे अंध मुलीवर अत्याचार
SHARES

मुंबईच्या नागपाडा परिसरात एका अंध मुलीवर तिच्यात नातेवाईकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुटुंब कलहातून त्या नातेवाईकाने पून्हा अत्याचार करण्याची धमकी दिल्यानंतर पीडित मुलगी मानसिक तणावाखाली गेली होती. त्यावेळी मानसोपचार तज्ञांनी केलेल्या चौकशीत तिने सात वर्षापूर्वी त्या नातेवाईकाने केलेल्या अत्याचाराची माहिती घरातल्यांना दिल्यानंतर ही घटना समोर आली. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात मुलीची वहिनी, वहिनीचा भाऊ आणि त्याचा मित्र अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः- मनसे- अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, ग्राहकांना दिला मराठीचा पर्याय

नागपाडा परिसरात पीडित मुलगी तिचे आई-वडिल, भाऊ आणि बहिणीसोबत राहते. पीडित मुलगी पूर्णतहा अंध असल्यामुळे तिला कायम दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. २०१३ मध्ये पीडित मुलगी घरात ऐकटी असताना वहिनीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. त्यावेळी पीडित मुलीचे वय १७ वर्ष होते. त्यावेळी दोघांनी मुलीला घडलेल्या प्रकाराची महिती कुणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घडलेल्या प्रकारावर पीडित मुलीने भितीपोटी पडदा टाकला.  अशातच क्षुल्लक कारणांवरून मुलीचा भाऊ आणि वहिनीमध्ये वाद होत होते. हे वाद विकोपाला गेल्याने मुलीच्या वहिनीने मुलीच्या भावा विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तर आई-वडिलांविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यात तिघांना अटक झाल्यानंतर पीडित मुलगी घरी ऐकटीच असल्याने तिच्या वहिनीकडून तिला वारंवार मारहाण केली जात होती. त्याच बरोबर तिला धमकावले जात होते.

हेही वाचाः- लाँग विकेंडमुळे पर्यटकांची अलिबाग, शिर्डी, महाबळेश्वरला पसंती

दरम्यान काही दिवसांपूर्वी न्यायालयात एका सुनावणी दरम्यान आरोपींनी पून्हा मुलीची वाट अडवून मुलीला २०१३ प्रमाणे आताही लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली होती. ऐवढ्यावरच न थांबता दोघांनी मुलीच्या आई-वडिलांना ठार मारण्याचीही धमकवली. त्यामुळे तणावाखाली आलेल्या मुलगी स्वतःला मारून घेऊ लागली, केस उपटू लागली. कुटुंबियांनी अखेर मुलीला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. त्यावेळी २०१३ मध्ये तिच्यावर वहिनीचा भाऊ व एका मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली. त्यात तिच्या वहिनेनीही आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. आरोपींनी तिला मारहाण व धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी पीडित मुलीची वहिनी, तिचा भाऊ व भावाचा मित्र यांच्याविरोधात भादंवि कलम ३७६(एल), ५०६, ५०४, ३२३, ३४ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ८  व १३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा