धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत केले लैगिक अत्याचार


धक्कादायक ! अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत केले लैगिक अत्याचार
SHARES

मुंबईच्या काळाचौकी पोलिस ठाणे परिसरात अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटोच्या मदतीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुलीच्या मैत्रिणीसह पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- माझं लग्न तरी करून द्या, बेरोजगार तरूणाचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र

महाविद्यालयीन परिसरात शिक्षण घेणारी मुलगीही काळाचौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत  राहते. काही दिवसांपूर्वी ती तिच्या मैत्रिणीसह रहात होती. पीडित मुलीचे कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ होते. तसेच प्रियकरासोबतचा एक खासगी व्हिडिओही या मैत्रीणीला मिळाला होता. त्या बदल्यात धमकावून तक्रारदार मुलीला दोन अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. भीतीने मुलीने त्यांच्या मागण्या मान्य केल्या ९ सप्टेंबर, २०१९ पासून ९ जानेवारी, २०२१ पर्यंत तिच्यासोबत गैरप्रकार सुरू होता.

हेही वाचाः- राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांचं नवं पथक?

मात्र रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर मुलीने पोलिसांची मदत घेतली. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार काळाचौकी पोलिसांनी पीडितेची मैत्रीण आणि चौघांआरोपींविरोधात गुन्हा भादंवि कलम ३७६(बलात्कार), ३४ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. तर मैत्रीणीला अद्याप अटक केलेली नाही.  मुलीचा १८ वर्षीय प्रियकर ताडदेव येथील रहिवासी आहे. तर दोन अल्पवयी आरोपी वरळी व काळाचौकी येथील रहिवासी आहेत. आणखी एक आरोपी घोडपदेव येथील रहिवासी आहे.  आरोपींचे मोबाईल जप्त करून त्याच्या सहाय्याने न्यायवैधक पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित विषय