Advertisement

माझं लग्न तरी करून द्या, बेरोजगार तरूणाचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र

एका तरूणाने मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी केली आहे. एक नोकरी तरी द्या किंवा पोरगी पाहून माझं लग्न करून द्या, असं या तरूणाने पत्रात लिहिलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

माझं लग्न तरी करून द्या, बेरोजगार तरूणाचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र
SHARES

सरकारी पातळीवर रखडलेल्या नोकरभरतीच्या दुष्टचक्राला कंटाळून एका बेरोजगार तरूणाने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात तरूणाने मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी केली आहे. एक नोकरी तरी द्या किंवा पोरगी पाहून माझं लग्न करून द्या, असं या तरूणाने पत्रात लिहिलं आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 

मागील काही वर्षांपासून सरकार नोकऱ्यांमध्ये सातत्याने काही ना काही अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असून दुसरीकडे खासगीकरणानेही जोर धरलेला आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरूणांच्या संधी देखील दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. त्यातच सरकारी निर्णय, बदललेले निकष किंवा आरक्षणासारख्या विविध मुद्द्यावरून भरती प्रक्रिया सारखी लांबणीवरच पडत आहे. यामुळे तरूणांचं वय देखील वाया चाललेलं आहे. 

हेही वाचा- मराठा आरक्षण: तोपर्यंत सरकार काय करणार? संभाजीराजेंचा सवाल


हाच मुद्दा पकडून वाशीम येथील गजानन राठोड या ३५ वर्षांच्या तरूणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच गळ घातली आहे. आपल्या पत्रात गजानन याने लिहिलं आहे की,

माझं वय सध्या ३५ वर्ष झालं असून, आजपर्यंत माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण असं की मी गेल्या ७ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. परंतु काही ना काही कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथं मुलगी बघायला जातो, तिथं त्यांची एकच मागणी असते की मुलगा जाॅबवर पाहिजे. परंतु आपण अजून कोणत्याही प्रकारच्या नोकरीच्या जागा काढलेल्या नाहीत. त्यामुळं जॉब मिळणं कठीण आहे. करिता आपण मला एक तर जाॅब द्यावा, अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे ही नम्र विनंती, अशी मागणी गजानन राठोडने पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सद्यस्थितीत मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे तरूणांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. शिक्षण तसंच नोकरीतील आरक्षणावर स्थगिती आल्याने गोंधळाची परिस्थिती तयार झाली आहे. सरकारी भरती, महाविद्यालयातील प्रवेश रखडले आहेत. यामुळे तरूणांमधील नैराश्य वाढत आहे.

(washim man wrote a letter to maharashtra cm uddhav thackeray for delaying government job recruitment)

हेही वाचा- शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये- उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा