Advertisement

मराठा आरक्षण: तोपर्यंत सरकार काय करणार? संभाजीराजेंचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवली असून याप्रकरणी पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे.

मराठा आरक्षण: तोपर्यंत सरकार काय करणार? संभाजीराजेंचा सवाल
SHARES

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवली असून याप्रकरणी पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. तोपर्यंत मराठा समाजातील मुलांसाठी सरकार काय करणार? असा सवाल भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर आपली भूमिका मांडताना संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे समाजातील मुलांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे. शिक्षण तसंच नोकरीतील आरक्षावर स्थगिती आल्याने गोंधळाची परिस्थिती तयार झाली आहे. सरकारी भरती, महाविद्यालयातील प्रवेश रखडले आहेत. परिणामी पुढं नेमकं काय करायचं हे त्यांना सुचेनासं झालं आहे. या मुलांना कशा रितीने मदत करता येईल, यासंबंधी राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा, अशी विनंती संभाजीराजे यांनी केली.  

हेही वाचा- ठाकरे सरकारला मोठा दणका, मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम

राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी आणि इतर वकिलांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडली. परंतु बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली? पुढची तयारी करण्यासाठी की दुसऱ्या कुठल्या विषयासाठी? हे मला कळालं नाही. ही सुनावणी पुढे किती दिवस चालणार माहिती नाही. तरीही २५ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल, अशी अपेक्षा वाटत आहे. तोपर्यंत मराठी समाजातील मुलांसाठी सरकार काय करणार आहे, त्यांना काय मदत देणार आहे? हे सरकारने स्पष्ट करावं, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं.  

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला. आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही. या कायद्यांतर्गत ही भरती करता येणार नाही. हे प्रकरण गंभीर आणि मोठं असल्याने या प्रकरणी विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल, असं घटनापीठने सुनावणीत म्हटलं. यापुढील सुनावणी आता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. तोपर्यंत शिक्षण व नोकरी संदर्भातील रिक्त पदे भरताना सरकारला “जैसे थे” स्थिती कायम ठेवावी लागणार आहे.

(bjp mp sambhaji raje bhosale reacts on maratha reservation hearing in supreme court)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा