अंधेरीत चाकूचे वार करून व्यापाऱ्याला लुटले

  Andheri
  अंधेरीत चाकूचे वार करून व्यापाऱ्याला लुटले
  मुंबई  -  

  भर रस्त्यात चाकूचे वार करून व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार मुंबईच्या अंधेरी परिसरातून समोर आला आहे. निलेश राठोड (36) असे या व्यापाऱ्याचे नाव असून सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  निलेश राठोड हा चांदीचा व्यापारी आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे निलेश अंधेरीतील दागिन्यांच्या दुकानात फिरत असताना, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अंधेरी जे. पी. रोडवरील प्रभू पाठारे हॉलच्या समोर त्यांना दोन हल्लेखोरांनी गाठले आणि थेट त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. चेहऱ्याला रुमाल बांधून आलेल्या या दोघांनी निलेश राठोड यांच्या पायांवर चॉपरने वार केल्यानंतर निलेश जागच्या जागीच कोसळले. त्यानंतर होल्लेखोरांनी त्यांच्या हातातील जवळपास तीन किलो चांदी आणि 70 हजार रुपये रोकड घेऊन पळ काढला. पळताना हल्लेखोरांनी एका रिक्षावाल्याला पिस्तूल दाखवून बळजबरीने रिक्षा थांबवली आणि तिथून पसार झाले.

  संध्याकाळी आणि ते देखील अंधेरी सारख्या गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, चोरीस गेलेली चांदी आणि रोख रकमेची एकूण किंमत ही 2 लाख 70 हजारांच्या आसपास होती. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की, दरोडेखोरांना निलेश राठोड यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं असल्याची टीप मिळाली असावी.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.