गायक अवधूत गुप्तेंची पोलिसांत तक्रार

  BKC
  गायक अवधूत गुप्तेंची पोलिसांत तक्रार
  मुंबई  -  

  सुप्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या नावाच्या खोट्या ट्विटर अकाउंटचा फोटो काढून तो व्हायरल केल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बीकेसी येथील सायबर पोलिस ठाण्यात गुप्ते यांनी बुधवारी आपली लेखी तक्रार दिली असून, या प्रकरणी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

  काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या संपाविरोधात अवधूत गुप्ते यांच्या नावाचा ट्विटरवरचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र हे माझे नसून, माझ्या नावाचे फेक अकाऊंट बनवून त्याद्वारे ट्विट केल्याचे गुप्ते यांनी म्हटले आहे.

  मी स्वत: एक शेतकरी आहे. त्यामुळे मी असे ट्विट करूच शकत नाही, असे अवधूत गुप्ते यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले आहे. तसेच सोशल मीडिया हे काही न्यूज चॅनल्स नाहीत. त्यामुळे लोकांनी त्याकडे बातमी या नजरेने बघू नये असे देखील गुप्ते म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.