मानवी तस्करी प्रकरणात गायक दलेर मेहंदी दोषी


मानवी तस्करी प्रकरणात गायक दलेर मेहंदी दोषी
SHARES

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी याला पतियाळा न्यायालयाने २००३ मधील मानवी तस्करी प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यालाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे.


काय आहे प्रकरण?

१९९८-९९ च्या दरम्यान या दोन बंधुंनी दोन ग्रुपमधील १० जणांना बेकायदेशीररित्या परदेशात नेलं होतं. १९९८ आणि ९९ मध्ये अमेरिकेत दोनवेळा शो केले होते. त्यावेळी त्याने टीममधील १० सदस्यांना अमेरिकेत सोडून भारतात परतला होता. याच दरम्यान एका नायिकेसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या दलेरनं आपल्या टीममधील तीन मुलींना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये सोडलं होतं. त्यानंतर या दोघांवरच्या अनेक तक्रारी समोर आल्या. त्यावेळी तक्रारीवरून पतियाळा पोलिसांनी २००३ साली दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पतियाळा पोलिसांनी नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील दलेर मेहंदीच्या कार्यालयावर छापे मारून कागदपत्रेही जप्त केली होती. २००६ साली पतियाळा पोलिसांनी न्यायालयात दलेर मेहंदी निर्दोष असल्याच्या दोन याचिका दाखल केल्या होत्या. मेहंदी बंधुविरोधात सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने हा खटला पुढे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा