प्राॅपर्टीच्या वादातून बहिणीने केली भावाची हत्या


प्राॅपर्टीच्या वादातून बहिणीने केली भावाची हत्या
SHARES

वाडवडिलोपार्जित मालमत्तेवरचा हक्क हा मुलीचा अबाधित हक्क असतो. मात्र माहिममध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. प्राँपर्टीमध्ये भाऊ हिसा देत नसल्याच्या रागातून माहिममध्ये बहिणीने सख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बहिणीला अटक केली आहे. 

माहिमच्या कुची कुर्वे नगर, संतोष  चाळ, ६० फूट रोडवर मृत सैफ सीराउद्दीन खान (३२) हा पत्नीसोबत रहात होता.  एका खासगी इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून सैफ हा काम करत होता. मागील अनेक दिवसांपासून वडिलोपार्जित मालमत्तेवरून त्याचे त्याची बहिण सर्जीलसोबत वाद सुरू होता. सर्जील ही माहिम परिसरात गायवाडी पटेल चाळ परिसरात राहते. सर्जील ही लेडीज टेलर असून तिला प्राँपर्टीत हिस्सा हवा होता. तसेच  सर्जीलच्या प्रेमविवाहला सैफचा विरोध होता. दरम्यान शनिवारी सायंकाळी याच वादातून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला.

त्यावेळी राग अनावर झालेल्या सर्जीलने भाऊ सैफ याला जोरदार धक्का मारला. त्यावेळी सैफ हा मागच्या बाजूस डोक्यावर पडला. यात सैफ गंभीर जखमी झाल्याने त्याला जवळील सायन रुग्णालयात हजर करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान सैफचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सैफची पत्नी नाहिद सैफ खान हिच्या तक्रारीनुसार माहिम पोलिसांनी  कलम ३०२ भा.द.वी अंतर्गत गुन्हा नोंदवून सर्जील याला अटक केली आहे.  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा