मुंबई - एनएसईएलच्या (नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिडेट) झालेल्या घोटाळ्यात 13 हजार गुंतवणुकदारांचं 5 हजार 300 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. या घोटाळ्याचा पुढील तपास करण्यासाठी आयएएस राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापन केलीय. या एसआयटीमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त के. ए. एम. एम. प्रसन्नाही आहेत. या एसआयटीची पहिले तीन महिने दर पंधरा दिवसांनी ही बैठक होणाराय. नंतर दर महिन्याला एक बैठक होणाराय. प्रत्येक बैठकीचा अहवाल गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे द्यावा लागणाराय.