हाय हिल्स सॅण्डल्समुळे ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

...लग्न झाल्यानंतर शेख कुटुंब घरी परत जाण्यासाठी निघालं. हॉलमध्ये पहिल्या मजल्यावरून खाली उतरत असताना अचानक फेमिदाचा तोल गेला आणि ६ महिन्यांचा मोहम्मद तिच्या हातातून खाली पडला.

हाय हिल्स सॅण्डल्समुळे ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
SHARES

हाय हिल्स सॅण्डल्स घालण्याची फॅशन टीव्ही स्क्रिनवरून कधी सामान्यांच्या आयुष्याचा भाग बनली कळलंच नाही. पण हीच फॅशन एका ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव घेणारी ठरली आहे. कल्याणजवळच्या उल्हासनगरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.


पहिल्या मजल्यावर गेला तोल

उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात रहाणारं शेख कुटुंब रविवारी कल्याणच्या मातोश्री हॉलमध्ये एका लग्नासाठी आले होते. यावेळी फेमिदा शेख (वय २३) आपल्या ६ महिन्यांच्या बाळाला(मोहम्मद) सोबत घेऊन आली होती. लग्न झाल्यानंतर शेख कुटुंब घरी परत जाण्यासाठी निघालं. हॉलमध्ये पहिल्या मजल्यावरून खाली उतरत असताना अचानक फेमिदाचा तोल गेला आणि ६ महिन्यांचा मोहम्मद तिच्या हातातून खाली पडला.



डोक्यावर पडल्याने गंभीर दुखापत

पण फेमिदाचा तोल गेला तो तिच्या हाय हिल्सच्या सॅण्डल्समुळे. पहिल्या मजल्यावरून खाली उतरत असताना तोल जाऊन मोहम्मद तिच्या हातातून खाली पडला तो थेट तळमजल्याच्या जमिनीवर. या दुर्घटनेमध्ये मोहम्मद थेट डोक्यावर पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. शेख परिवाराने तातडीने मोहम्मदला जवळच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.


अपघाती निधनाची नोंद

हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी मोहम्मदला मृत घोषित केलं. या घटनेमुळे शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात महात्मा फुले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे. शेख कुटुंब कनिष्ट मध्यमवर्गातील असून मोहम्मदचे वडील उल्हासनगरमध्ये एका दुकानात हेल्पर म्हणून काम करतात तर फेमिडा गृहिणी आहे.



हेही वाचा

इंटरनेटवरून मुलींचा पाठलाग, गुगलच्या कर्मचाऱ्याला अटक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा