सिलेंडर डोक्यात पडून चिमुरडा ठार

Dharavi
सिलेंडर डोक्यात पडून चिमुरडा ठार
सिलेंडर डोक्यात पडून चिमुरडा ठार
See all
मुंबई  -  

डोक्यात गॅस सिलेंडर पडून मोहम्मद बिलाल शेख (6) या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धारावीतल्या एम. पी. नगरमध्ये घडली.

हा  चिमुरडा रहात असलेल्या घराच्या माळ्यावरील भाडेकरूचा खानावळ चालवण्याचा व्यवसाय असल्याने सिलेंडर घरपोच करण्यासाठी एच. पी. कंपनीचा गॅस वितरकाचा कर्मचारी घराकडे आला होता. कर्मचारी घराच्या माळ्यावर चढत असताना धक्का बसल्याने कर्मचाऱ्याचा तोल जाऊन हातातून सिलेंडर निसटला आणि तो थेट घराच्या शिडीखाली झोपलेल्या चिमुरड्याच्या डोक्यावर पडला. त्यावेळी झोपेत असलेला मोहम्मद जागेवरच रक्तबंबाळ होऊन निपचीत पडला. कर्मचाऱ्याने तात्काळ एका दुचाकीवरून चिमुरड्याला शीव रुग्णालयात दाखल केले. परंतु दाखल होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी गॅस वितरक कर्मचारी मगा कृष्णा नाडार (32) याला सिलेंडरसह अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.