सोने तस्कार टोळीचा पर्दाफाश


सोने तस्कार टोळीचा पर्दाफाश
SHARES

कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या सोने तस्करांच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कस्टम विभागाने तिघांना अटक केली असून तब्बल 56 लाखांचे सोने जप्त केल आहे. पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये दोघे सफाई कंपनीचे कर्मचारी आहेत. तर एका प्रवशाला देखील कस्टमने बेडया ठोकल्या आहेत.अटक करण्यात आलेल्यांमध्ये सफाई कंपनीचा पर्यवेक्षक (सुपरव्हायजर) सुमित दलाल (27), सफाई कामगार आकाश मगर(25) तसेच दुबईहून मुंबईत आलेला प्रवासी मोहम्मद अशरफ (29) याचा समावेश आहे.

रविवारी दुबईवरून मुंबईला आलेला प्रवसी मोहम्मद अशरफ अमू (29)च्या मागावर कस्टमचे अधिकारी होते. त्याचा पाठलाग सुरू असतानाच अचानक मोहम्मद अशरफ स्वछता गृहात शिरला आणि त्याच्याकडील दोन पाकिटे त्याने कचराकुंडीत फेकून तिथून पळ काढला.

त्यावेळी स्वछता गृहाची पाहणी केली असता एका कचराकुंडीत 1 हजार 865 ग्रेम वजनाची 16 सोन्याची बिस्किटं कस्टमच्या अधिकाऱ्यांना सपडली. 56 लाखांचे हे सोने सापडताच कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या स्वछतागृहावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पाळत ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हा एक तरुण संशयास्पद पद्धतीने वावरत असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आकाशचा पाठलाग सुरू केला. तो तिथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. हे सोने आपले नसल्याचे सांगत त्याने त्याच्या वरिष्ठ असलेल्या सुमित दलाल (27) याच्याकडे बोट दाखवले. त्यानंतर कस्टमचे अधिकारी तत्काळ विमानतळावर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या सिला सोल्यूशनमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या सुमित दलाल याच्याकडे पोहचले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय