चेंबूरमधील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या

मुंबईत शिवसेना नगरसेवकाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चेंबूरमधील शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या
SHARES

मुंबईत शिवसेना नगरसेवकाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांचा मुलगा अभिषेक श्रीकांत शेट्ये (25) याने राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

श्रीकांत शेट्ये हे चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग 155 चे नगरसेवक आहेत. सुमन नगर परिसरातील इमारतीत शेट्ये कुटुंबीय राहत आहे. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपला होता. त्याचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

बराच वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने त्याचा भाऊ अभिषेकला खोलीत बघायला गेला. तेव्हा अभिषेकने त्याला गळफास घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याला तात्काळ मंगल आनंद येथील सुश्रुत रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केलं. अभिषेकने आत्महत्या का केली, याची कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस  तपास करत आहे.


हेही वाचा -

दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा