परदेशी महिलेचा विनयभंग करणारा गजाआड

  Mumbadevi
  परदेशी महिलेचा विनयभंग करणारा गजाआड
  मुंबई  -  

  दक्षिण मुंबईत परदेशी महिलेचा विनयभंग करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. महिला ही दक्षिण कोरियन नागरिक असून या प्रकरणी पोलिसांनी रमेश घोगरे नावाच्या इसमाला अटक केली आहे.

  पायधुनी परिसरातील हॉटेल सिल्वर मुनमध्ये ३० वर्षीय दक्षिण कोरियन महिला थांबली होती. दिल्लीवरून टुरिस्ट व्हिसावर ही महिला मुंबईला आली होती. गुरुवारी हॉटेलच्या समोर उभी असताना एक इसम आपल्याला न्याहाळत असल्याचं महिलेला जाणवलं. हा इसम हॉटेलचाच कर्मचारी असल्याचं महिलेला वाटलं. त्यामुळे तिनं आपली बॅग त्याच्या ताब्यात देऊन रुममध्ये नेण्यास सांगितलं. रूममध्ये जाताच आपण केवढी मोठी चूक करून बसलो आहोत ते महिलेला समजले. रुममध्ये पोहोचल्यावर जेव्हा महिला फ्रेश होण्यास स्वच्छतागृहात गेली तेव्हा अचानक हा रमेश घागरे मागून आला आणि महिलेवर बळजबरी करू लागला. महिलेनं आरडा ओरडा करण्यास सुरुवात करताच रमेशनं तिथून पळ काढला.

  घडलेल्या प्रकारानंतर महिलेनं पोलिसांत याची तक्रार दिली. हॉटेलमधल्या सीसीटीव्हीची तपासणी केल्यानांतर रमेश घोगरेला पायधुनी पोलिसांनी अटक केली. रमेश घोगरे हा हॉटेलचा वेटर नसून त्याच परिसरात अंडा भुर्जीचा गाडी लावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.