धार्मिक स्थळं बंद, आता चोरांचा इमारतींमधल्या चप्पलांवर डल्ला

सोसायट्यांमध्ये प्रवेश करून चप्पल चोरणाऱ्यांनी सध्या दक्षिण मुंबईत धुमाकूळ घातला आहे.

धार्मिक स्थळं बंद, आता चोरांचा इमारतींमधल्या चप्पलांवर डल्ला
SHARES

कोरोनामुळे सध्या प्रार्थना स्थळं बंद आहेत. त्यामुळे प्रार्थना स्थळांबाहेरून चप्पल, शूज चोरी करणाऱ्यांनी आता आपला मोर्चा गृहनिर्माण संस्था आणि इमारतींकडे वळवला आहे. बऱ्याच उच्चभ्रू वस्तीतील सोसायट्यांमध्ये प्रवेश करून चप्पल चोरणाऱ्यांनी सध्या दक्षिण मुंबईत धुमाकूळ घातला आहे.  

मागील शनिवार आणि रविवार रोजी गिरगाच्या पुरव हाइटमधून डझनभर जोड्यांची पादत्राणे चोरी झाली. एका तासाच्या कालावधीत या चप्पला चोरल्या गेल्या. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला.

पुरव हाईट्स सोसायटीचे अध्यक्ष हेमांशु देसाई यांनी सांगितलं की, “एक अज्ञात व्यक्ती लिफ्टचा वापर करून केवळ शूच्या रॅकमध्ये आणि आसपासच्या अपार्टमेंटच्या बाहेर ठेवलेली पादत्राणे उचलण्यासाठी इमारतीत शिरली.

तेव्हापासून, खबरदारीचा उपाय म्हणून, काही रहिवाशांनी त्यांचे सामान आधीपासूनच आपल्या घरांमध्ये घेतले आहे आणि जादा दक्षता ठेवली जात आहे. याविरोधात ते पोलिसात तक्रार देखील दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

रात्री 8 नंतर अज्ञात व्यक्ती इमारतीत शिरतो. यावेळी बहुतेक रहिवासी घरात एकतर टीव्ही पाहत असतात किंवा कुटुंबियांसोबत व्यस्त असतात.

अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर, ओरियन टॉवर इथं काही आठवड्यांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. इमारतीतील रहिवासी धीरज जैन यांनी सांगितलं की, “सुमारे अर्धा डझन जोड्या शूज चोरीला गेले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “आम्हाला नंतर कळलं की केवळ आमच्या सोसायटीतच नाही. तर अशा बऱ्याच सोसायटीमध्ये असे प्रकार घडले आहेत. शक्यतो चोर हाऊसिंग सोसायट्यांना लक्ष्य करीत आहेत.

“अद्यापपर्यंत आम्हाला कार्यक्षेत्रातील रहिवासी, सोसायटी किंवा इमारतींकडून कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. एकदा कोणी आमच्याकडे औपचारिक तक्रार घेऊन संपर्क साधल्यास आम्ही त्यावर कारवाई करू, ”असं पी रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी सांगितलं.



हेही वाचा

परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा