मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अमित चांदोळेला ईडी कोठडी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चांदोळे यांना येत्या ९ डिसेंबर पर्यंत ईडी कोठडी स्पेशल कोर्टाने सुनावली आहे

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अमित चांदोळेला ईडी कोठडी
SHARES

टॉप सिक्युरिटी (Tops Security) समूहाच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहार गुन्ह्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या घरासह कार्यालयावर काही दिवसांपूर्वी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चांदोळे यांना येत्या ९ डिसेंबर पर्यंत ईडी कोठडी स्पेशल कोर्टाने सुनावली आहे

अमित चांदोळे यांची तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून त्यांना २६ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता कोर्टाने त्यांना ९ डिसेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ज्या वेळी ईडीने धाड टाकली त्यावेळेस ते परदेशात होते. मात्र ईडीने छापेमारी केल्याचे कळताच ते भारतात परतले. टॉप्स ग्रुप प्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) गुन्हा दाखल करून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या जवळचा अमित चांदोळेला अटक केल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी ईडीप्रकरणातील तक्रारदाराविरोधात नवा गुन्हा दाखल केला आहे. टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी हा गुन्हा दाखल केला.

हेही वाचाः-रक्तदान करा, १ किलो पनीर, चिकन मिळवा

ईडीने टॉप्स ग्रुपप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांतील तक्रारदार व टॉप्स ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्याविरोधात शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांच्यावतीने याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८,४६९, १२० (ब), ३४ सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी याप्रकरणी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.

हेही वाचाः-मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं

अय्यर यांच्यासह इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नंदा यांच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीत करण्याता आली होती. तक्रारीनुसार, आरोपींनी बोर्ड मिटींगमधील मिनिट्समध्ये फेरफार केले, तसेच डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर केला, बनावट अकाउंट, बॅलान्सशीट वापर केला, ग्राहकांकडून आलेले रक्कम दुसरीकडे वळती केली, २१.५९ कोटींचे चुकीचे खर्च दाखवले, तसेच आरोपींनी केलेल्या एका व्यवहारातून कंपनीला ६.३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले, कंपनीचे ग्राहक विरोधकांकडे वळवले, त्यामुळे कंपनीला ७८.१२ कोटींचे नुकसान झाले असे विविध आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा