दाऊदच्या कुटुंबासाठी दुबईत 'हसीना पारकर'चं स्पेशल स्क्रीनिंग?


दाऊदच्या कुटुंबासाठी दुबईत 'हसीना पारकर'चं स्पेशल स्क्रीनिंग?
SHARES

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हसीना पारकर' या चित्रपटावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. गुरुवारी म्हणजेच प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग थेट दुबईत आणि ते देखील अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या कुटुंबियांसाठी ठेवण्यात आल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

गुरुवारी रात्री दुबईतील एका नामांकित चित्रपटगृहात 'हसीना पारकर' चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. तसेच हसीना पारकरचा मुलगा अलिशा पारकर तसेच इकबाल कासकारच्या कुटुंबीयांनी आणि इतर निकटवर्तीयांनी यावेळी एकत्र चित्रपट बघितल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

अशा प्रकारे चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग का केलं गेलं? आणि यावेळी डी कंपनीतील कोणी गँगस्टर देखील या स्क्रिनिंगला उपस्थित होता का? याचा सध्या तपास यंत्रणा शोध घेत आहेत.

१८ सप्टेंबरला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक झाल्यानंतर मोठमोठे खुलासे झाले आहेत. एकीकडे अजूनही दाऊद हा पाकिस्तानातच लपून बसल्याचं इकबालने तपास यंत्रणांसमोर मान्य केलं आहे, तर दुसरीकडे कशा प्रकारे आजही मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील बिल्डर आणि ज्वेलर्सकडून दाऊदच्या नावावर खंडणी वसुली सुरु आहे, हे समोर आलं आहे.

शुक्रवारी भारतातील विविध चित्रपट गृहांत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीवर आधारित असलेला हसीना पारकर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. १९९३ च्या मुंबई ब्लास्टपूर्वी देशाबाहेर पळाल्यानंतर मुंबईतील दाऊदचे व्यवहार हे त्याची बहीण हसीना पारकर सांभाळत होती. ६ जुलै २०१४ ला हसीना पारकरचा मृत्यू झाला.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा