बुट पॉलिश कर्मचारी करणार प्रवाशांची सुरक्षा

 wadala
बुट पॉलिश कर्मचारी करणार प्रवाशांची सुरक्षा

चेंबूर - वडाळा लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दक्षता कशी घ्यावी याबाबत चेंबूर रेल्वे स्थानकातील बूटपॉलिश कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. शनिवारी वडाळा लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक सदाशिव खोत यांनी स्थानकातील चौकीत बैठक घेऊन हे मार्गदर्शन केले.

रेल्वे स्थानकात एखादी घटना घडल्यास याची माहिती बूट पॉलिश कर्मचाऱ्यांना सर्वात आधी मिळते. त्यांनी ती माहिती तात्काळ लोहमार्ग पोलिसांना देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गर्दुल्ले स्थानकात प्रवाशांना त्रास देत असतील तरीही बघ्याची भूमिका न घेता संबंधित माहिती पोलिसांपर्यंत पोहचवण्याचे काम बूट पॉलिश कर्मचाऱ्यांनी करायला हवे, असेही खोत यांनी सदरील बैठकीत सांगितले.

Loading Comments