वांद्र्यात सहा फुटांचा कोब्रा

वांद्रे - 6 फूट लांब... भेदक डोळे... आणि जिवघेणा फणा... वांद्र्याचा रेक्लमेशन परिसर सोमवारी रात्री प्रचंड तणावात होता. परिसरात 6 फुटांचा कोब्रा दिसल्याची कुजबूज सुरू झाली होती. रेक्लमेशन परिसरात हा कोब्रा दिसल्यानंतर स्थानिकांची भीतीने गाळणच उडाली. पण नागरिकांनी प्रसांगवधान दाखवत तात्काळ 100 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना याची माहिती दिली. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमधले सर्पमित्र मुरलीधर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या कोब्राला पकडले.

Loading Comments