शिवडीत ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोघांचा बळी

 Sewri
शिवडीत ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोघांचा बळी
शिवडीत ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोघांचा बळी
शिवडीत ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोघांचा बळी
शिवडीत ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोघांचा बळी
See all

शिवडी - दुचाकी आणि ट्रकच्या भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिवडी (प.) येथील जकेरिया बंदर बामर लॉरी अॅक्ट कंपनीच्या समोर सोमावरी रात्री 11.30 वाजता हा अपघात घडला. यामध्ये सलमान नसीफ खान (22) आणि सलमान अब्दुल जब्बार खान (24) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ते दोघेही शिवडी क्रॉस रोड येथील रहिवासी होते.

सलमान नसीफ खान आणि त्याचा मित्र सलमान अब्दुल जब्बार खान हे दोघेही भरवेगात मोटरसायकल चालवत होते. मात्र शिवडीतील जकेरिया बंदर बामर लॉरी अॅक्ट कंपनी येथील कॉटनग्रीन येथे वळण घेताना समोरून येणाऱ्या ट्रकने भीषण धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलचा चुराडा झाला. यात दोघेही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्याऐवजी ट्रकचालक आणि क्लिनर यांनी घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच आर. ए. किडवाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुचाकीस्वारांना केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र काही क्षणातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक तपास अधिकारी समीर अभंग यांनी दिली. वाहचालक आणि क्लिनरचा शोध पोलीस करत आहेत.

Loading Comments