भरधाव वेगामुळे झाला अपघात

 vile parle
भरधाव वेगामुळे झाला अपघात
भरधाव वेगामुळे झाला अपघात
See all

विलेपार्ले - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बुधवारी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान एक कार अपघात झाला. कार भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाला. कारचा वेग 100 किलोमीटर एवढा होता. चालकाचं कारच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

कारचा वेग एवढा होता की समोर असलेल्या गतिरोधकावर जाऊन आदळली आणि लोखंडाचा इलेक्ट्रीक पोलही उखडला. या घटनेत कार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला व्ही.एन.देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार कार वांद्र्याहून अंधेरीच्या दिशेने येत होती. तेव्हा हा अपघात झाला.

Loading Comments