बेस्ट बसचा झाला चेंदामेंदा

 Dadar
बेस्ट बसचा झाला चेंदामेंदा
बेस्ट बसचा झाला चेंदामेंदा
बेस्ट बसचा झाला चेंदामेंदा
See all
Dadar , Mumbai  -  

दादर - डंपरने बेस्टला धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री दादरच्या वर्कशॉप परिसरात घडली. विशेष म्हणजे ही डंपरने दिलेली धडक इतकी जोरात होती की बस संरक्षक भिंतीवर आदळली आणि संरक्षक भिंतही कोसळली. 

बांधकामाची माती घेऊन जात असताना डंपर आणि बसमध्ये अपघात झाला. यात बेस्टचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली.

संबधित बिल्डर आणि इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, डंपर चालक राजेशकुमार त्रिपाठी आणि प्रवीण कुमार तिवारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading Comments