सुशांतचा स्टाफ दिपेशने १० लाखांच्या नुकसान भरपाईसाठी घेतली न्यायालयात धाव


सुशांतचा स्टाफ दिपेशने १० लाखांच्या नुकसान भरपाईसाठी घेतली न्यायालयात धाव
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबीकडून एका पाठोपाठ एक दोषींवर अटकेची कारवाई केली जात आहे. नुकतीच या प्रकरणात एनसीबीने २३ वी अटकेची कारवाई केली.  या प्रकऱणात सुशांतचा स्टाफ दिपेश सावंत याला ही अटक केली होती. सुशांतला ड्रग्ज खरेदी करून आणून देण्याबाबत त्याच्यावर आरोप करण्यात आले. त्याच दिपेशने आता मुंबई उच्च न्यायालयात १० लाख रुपयांची भरपाईसाठी याचिका दाखल केली आहे.

हेही वाचाः- तर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग

सुशांतकडे स्टाफ म्हणून काम करणाऱ्या दिपेशने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहे. एनसीबीने चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले. त्यानंतर तब्बल ३६ तासानंतर आम्हाला न्यायालयात हजर करण्यात आले. तर कायद्यानुसार कारवाईनंतर २४ तासात आम्हाला न्यायालयात हजर करणे गरजेचे होते.  त्यामुळे या कारवाई न्यायालयाने आखून दिलेले नियम न पाळल्याचा आरोप दिपेशने याचिकेत केला आहे. ही याचिका दिपेशने ५ आँक्टोंबर रोजी न्यायालयात दाखल केली.   

हेही वाचाः-खूशखबर! अखेर महिलांना मिळाली लोकल प्रवासाची परवानगी                              

याचिकेत दिपेशने असेही म्हटले आहे की, एनसीबीने केलेल्या कारवाईत आम्हाला ५ आँक्टोंबरला ८ वा. अटक केल्याचे दाखवले आहे. मात्र याचिकेत दिपेशला ४ आँक्टोंबरला रात्री १० वा. अटक केले असून ६ आँक्टोंबरला न्यायालयात हजर करण्यात आले. दिपेशने  त्याचे वकिल राजेंद्र राठोड आणि आमिर कोराडिया यांच्या मदतीने ही याचिका दाखल केली असून या संदर्भात न्यायालयात आतापर्यंत दोन वेळा सुनावणी झाली आहे. त्यात एनसीबीने स्पष्टिकरण देण्यासाठी वेळ मागितला आहे.

Read this story in English
संबंधित विषय