Advertisement

तर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग

मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेतली असून अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे.

तर जग तुमची दखल घेतं, मनसेच्या दणक्यानंतर ‘अॅमेझाॅन’ला जाग
SHARES

भारतीय ग्राहकांना स्थानिक भाषांमध्ये खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देताना त्यात मराठी भाषा का नाही? असा प्रश्न विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आॅनलाईन शाॅपिंग पोर्टल चालवणारी कंपनी अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्ट यांना सणांच्या उंबरठ्यावर मोठे सेल सुरू असतानाच दणका दिला होता. मनसेच्या या भूमिकेची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेतली असून अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे.

मनसेचे अखिल चित्रे यांनी मनसैनिकांसह काही दिवसांपूर्वीच अॅमेझाॅनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात धडक दिली होती. संपूर्ण महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी असून इथं या भाषेचा यथोचित वापर होणं आणि व आदर राखणं बंधनकारक आहे. आपल्या कंपनी अॅपमध्ये माहिती घेणे, विकत घेणे, जनसंपर्क करणे इ. गोष्टी करण्यासाठी ‘Choose your prefered language’ पर्यायांमध्ये अनेक भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या उपलब्ध पर्यायांमध्ये मराठी भाषेचा समावेश न करून मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (amazon india ready to include marathi language in shopping portal after maharashtra navnirman sena protest)

हेही वाचा - सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल राज ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले...

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून इथं मराठी भाषेच्या बाबतीत केलेला दुजाभाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही. हे लक्षात घ्यावं. ही घटना चुकून झाली असेल, तर माफी मागून आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सदर अॅपमध्ये लवकरात लवकर मराठी भाषेचा समावेश करावा. जर जाणीवपूर्वक इतर राज्यांची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा पत्रातून देण्यात आला. 

त्याशिवाय अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनाही यासंदर्भातील तक्रारीचा मेल पाठवण्यात आला. या मेलला बेजॉस यांच्या वतीने 'अॅमेझॉन.इन'च्या जनसंपर्क विभागाने प्रतिसाद दिला आहे. 'बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळे आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं अॅमेझॉननं स्पष्ट केलं आहे.

शिवाय अॅमेझाॅनचं शिष्टमंडळ मुंबईत येत असून राजसाहेब म्हणतात तसं... तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं, अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली आहे.

हेही वाचा - ‘ब्रँड ठाकरे’असला, तरी…

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा