एसटी चालकांचं आंदोलन, भिवंडी आगाराचं काम ठप्प

 Bhiwandi ST Depot
एसटी चालकांचं आंदोलन, भिवंडी आगाराचं काम ठप्प

मुंबई सेंट्रल - भिवंडी डेपोबाहेर एसटीचालकाला झालेल्या मारहाणीचे परिणाम राज्यभरात पाहायला मिळाले. मारहाणीचा निषेध करण्यासाठी शनिवारी मुंबई सेंट्रल आणि परळच्या एसटी डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. सकाळी सात ते नऊ वाजताच्या दरम्यान हे आंदोलन सुरु होतं. भिवंडी डेपोबाहेर रिक्षा हटवण्यावरुन झालेल्या वादानंतर रिक्षाचालकानं एसटीचे बसचालक प्रभाकर गायकवाड यांना मारहाण केली होती. मारहाणीनंतर प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. यामुळे आगारातील कामकाज ठप्प झालं असून फक्त बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या गाड्या सुरु आहेत.

Loading Comments