राज्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्क्यांवर

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट ८५ टक्क्यांवर
SHARES

राज्यात आज १९ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराखालील (ऍक्टिव्ह) रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. आज दिवसभरात १० हजार ५५२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे.  आजही सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट नोंदवली गेली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः- बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालं ‘हे’ निवडणूक चिन्ह

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७८ लाख ३८ हजार ३१८ नमुन्यांपैकी १५ लाख ५४ हजार ३८९ नमुने पॉझिटिव्ह ( १९.८३ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख ८० हजार ९५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार १७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

हेही वाचाः- मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा

दरम्यान, कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून साडेपाच हजार इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्त पेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा