स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, १४३ कोटींवर डल्ला

बँकेचा सर्व्हर हॅक करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये शिरकाव करण्यात आला. यानंतर त्यांच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचं बँकेकडून तक्रारीत म्हटलं आहे. पैसे ज्या खात्यांमध्ये फिरवण्यात आले आहेत ती सर्व बँक खाती देशाबाहेरची आहेत.

स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, १४३ कोटींवर डल्ला
SHARES

पुण्याच्या काॅसमाॅस बँकेवर  सायबर चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना ताजी असतानाच, स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या नरिमन पॉईंट येथील शाखेचं सर्व्हर हॅक करून १४३ कोटी रुपये लंपास केल्याचं उघडकीस अालं अाहे. या प्रकरणी बँकेच्या नरिमन पॉईंट शाखेने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे.


परदेशात पैसे ट्रान्सफर

पुण्याच्या काँसमाँस बँकेत रेन्सम या वायरसचा हल्ला करून सायबर चोरट्यांनी ८४ कोटी रुपये लंपास केले होते. त्या चोरट्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. अशातच स्टेट बँक आॅफ मॉरिशसच्या शाखेतून चोरट्यांनी १४३ कोटी रुपयांवर डल्ला मारला. बँकेचा सर्व्हर हॅक करत वेगवेगळ्या खात्यांमध्ये शिरकाव करण्यात आला. यानंतर त्यांच्या खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचं बँकेकडून तक्रारीत म्हटलं आहे. पैसे ज्या खात्यांमध्ये फिरवण्यात आले आहेत ती सर्व बँक खाती देशाबाहेरची आहेत. बँकेने यासंबंधी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.


९ महिन्यात तिसरी घटना

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ५ अाॅक्टोबर रोजी बँक प्रशासनाकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार नोंदवली होती. मागील  ९ महिन्यात अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. चेन्नईतील सिटी युनियन बँकेतून ३४ कोटी रुपयांची रक्कम गहाळ झाली होती. कॉसमॉस बँक चोरीप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली होती. तपास केला असताना चेन्नईतील बँक दरोड्यातही त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.


बनावट डेबिट कार्ड

गेल्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये चेन्नईतील सिटी युनियन बँकेचा सर्व्हर हॅक करून चोरट्यांनी ३३ कोटी रूपयांपेक्षा जास्त रोकड लुटल्याची घटना घडली होती. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यात सर्व्हर हॅक करून ९४ कोटी रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलिसांनी औरंगाबाद, नांदेड, मुंबई परिसरातून सात आरोपींना अटक केली होती. सात आरोपींनी बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून विविध बँकांच्या एटीएम केंद्रातून रोकड काढून घेतली.

रोकडच्या बदल्यात मोबदला 

या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराने त्यांना बनावट डेबिट कार्ड देऊन रोकड काढण्याच्या बदल्यात काही मोबदला दिल्याचा संशय होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेले शेख महंमद, फहीम खान, ऑगस्टीन वाझ उर्फ अँथोनी आणि नरेश महाराणा यांचा चेन्नईतील सिटी युनियन बँकेतील रोकड लूट प्रकरणात सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं.



हेही वाचा -

मंत्रालयात कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सायबर चोरट्यांचा वकिलाला २७ हजारांना गंडा



 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा