सायबर चोरट्यांचा वकिलाला २७ हजारांना गंडा


सायबर चोरट्यांचा वकिलाला २७ हजारांना गंडा
SHARES

डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्यांनी शहरात धुमाकुळ घातला आहे. विशेष म्हणजे या प्रकारच्या गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत असून पोलिसांना त्यांना आवरणं कठीण होऊन बसलं आहे. नुकतीच या चोरट्यांनी पायधुनी परिसरातील हायकोर्टाच्या एका वकिलाला २७ हजार रुपयांचा गंडा घातला. 


४ वेळा पैसे काढले

मूळचे उत्तरप्रदेशचे मनमोहन शर्मा हे मस्जिद बंदर येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. शर्मा हे उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. शर्मा यांचं मांडवी येथील शाखेत खाते असून त्यातूनच व्यवहार करतात. ९ आॅक्टोबर रोजी शर्मा हे त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाइलवर एका मागोमाग एक मेसेज येऊ लागले. त्यांच्या खात्यातून ४ वेळा पैसे काढण्यात आले होते. तीन वेळी १४ हजार ९०० रुपये काढले. तर चौथ्यांदा १२ हजार ५०० रुपये काढले.


कार्ड ब्लाॅक

याबाबत त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून माहिती देत त्यांचे कार्ड ब्लाॅक करून घेतले. अनोळखी व्यक्तींनी माहिती चोरून हे पैसे चोरल्याचे लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पायधुनी पोलिस अधिक तपास करत आहे.



हेही वाचा -

शेअर मार्केट कोसळल्यानं वृद्धाने केली आत्महत्या

दादर फूल मार्केटमध्ये गोळ्या झाडून एकाची हत्या



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा